महाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

एम आय एम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

पोलीस क्राईम न्यूज मराठवाडा चीप ब्युरो मुक्तार मनियार संपर्क 70 286 23 100

लातूर दिनांक 11/7/2025,एमआयएमएम पक्षाचे पक्षाचेक्षाला बळकट करण्यासाठी सय्यद इम्तियाज जलील यांचा औसा कार्यकर्त्यांना कानमंत्र..
औसा प्रतिनिधी
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची औसा तालुका व शहरातील एका शिष्टमंडळाने सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 9 जूलै 2025 रोजी औरंगाबाद येथे जाऊन त्यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीदरम्यान औसा तालुक्यातील आणि शहरातील सद्यस्थितीचा सखोल आढावा सादर करण्यात आला.
शिष्टमंडळाने इम्तियाज जलील यांच्यासोबत आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत विस्तृत चर्चा केली. या चर्चेतून पक्षाला स्थानिक पातळीवर अधिक बळकट करण्याच्या रणनीतीवर भर देण्यात आला. प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “पक्षात सक्रियपणे काम करत राहा. तुमचे काम आम्ही पाहत आहोत. पक्षात जो कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करतो, त्याला पक्ष कधीही विसरत नाही.”
पक्षाला मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहा. “पक्ष मजबूत झाला, तर आपणही मजबूत होतो,” कार्यकर्त्यांनी धडाडीने कामाला लागावे असे आदेश दिले.
यावेळी एमआयएमचे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांच्यासह शेख वहाब, तुराब पठाण, शेख वाजीद, फेरोज शेख, ताहेर शेख, मोहसीन आणि बिलाल आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील यांचा सत्कार करून त्यांचे आभार
मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button